Breaking News

सिडकोमध्ये ‘सावित्रीची लेक’ पुरस्कार सोहळा उत्साहात

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडको भवन येथे गुरुवारी (दि. 16) क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 189 व्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिडको बी. सी. एम्पलॉईज असोसिएशन तर्फे सन 2003 पासून दरवर्षी सावित्रीमाई फुले जयंती दिनाचे आयोजन करण्यात येऊन महामंडळामध्ये उल्लेखनीय सेवा बजावलेल्या महिला कर्मचारी/अधिकारी यांना या निमित्ताने ‘सावित्रीची लेक’ हा पुरस्कार देऊन गौरविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमास सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, सहव्यवस्थापकीय संचालक – 1 डॉ. प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक-2 अशोक शिनगारे, मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोली, सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल व सरचिटणीस जे. टी. पाटील, सिडको प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद बागुल, सरचिटणीस नरेंद्र हिरे व कार्याध्यक्ष नितिन कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद लेखापाल श्रद्धा कोळी यांनी भूषवले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत उत्तम कामगिरी केलेल्या महामंडळातील कर्मचार्‍यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा झाला. या वर्षीचा ‘सावित्रीची लेक’ हा पुरस्कार कविता पगारे, सहाय्यक लेखा अधिकारी यांना देण्यात आला. सूत्रसंचालन सुवर्णा अहिरे तर आभारप्रदर्शन माधुरी माणिककुवर यांनी केले.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply