मोहोपाडा : प्रतिनिधी
इंडियन फेडरेशन अॅण्ड स्पोर्ट्स आयोजित दुसर्या आंतरराष्ट्रीय इंडो-नेपाळ क्रीडा स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार्या चौक येथील स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी अग्रस्थान कायम ठेवले आहे. एकूण चार सुवर्ण व दोन रौप्यपदके पटकावून त्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले.
थाळीफेकमध्ये 14 वर्षांखालील मुलांच्या गटात श्री स्वामीनारायण गुरुकुलच्या रुद्र भगत याने, 17 वर्षांखालील मुलांमध्ये योजित राव, धावण्याच्या 100 मी. शर्यतीत 14 वर्षांखालील मुलांच्या गटात शिवांग तिवारी व प्रियांक थवानी यांनी सुवर्णपदके जिंकली, तर 100मी धावण्याच्या शर्यतीत 17 वर्षांखालील मुलांमध्ये नावीन्य पवार आणि बॅडमिंटनमध्ये आयुष भोसले यांनी रौप्यपदक मिळवले. याबरोबरच फुटबॉल संघाने 17 वर्षांखालील गटात उपविजेतेपद प्राप्त केले. फुटबॉल संघात ओंकार भोये, उदय पटेल, आयुष मोरे, आयुष भोसले, रुद्र भगत, शिवांग तिवारी, नावीन्य पवार, अथर्व दुबे, प्रियांका थवानी, कृष्णा रावरिया, अनिकेत शुक्ला, प्रीत सावलिया, देव पटेल, तन्मय पटेल, गौरांग साटोणे या खेळाडूंचा समावेश होता. भारताने पदकतालिकेत चार सुवर्ण, 19 रौप्यसह एकूण 23 पदकांची कमाई केली आहे.
यशस्वी खेळाडूंना हरिकेश सिंग व दीपक हंबीर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे संचालक योगेश्वरदास स्वामी, आत्मस्वरूप स्वामी व प्राचार्य जॉन्सन यांनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …