श्रीवर्धन : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे द चॅम्पियन्स कराटे क्लबच्या वतीने चॅम्पियन्स कराटे लीग 2020 रंगली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार्या श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील कराटेपटूंनी पदकांची कमाई करीत यश मिळविले. स्पर्धेत देशभरातून जवळपास एक हजार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात रायगडातील ओंकार राजपूत याने काता प्रकारात रौप्य, अनिकेत साखरे याने कुमितेमध्ये रौप्य आणि स्वरूप पुळेकर याने कांस्यपदक जिंकले. या सर्व यशस्वी खेळाडूंसह प्रशिक्षक अविनाश मोरे, प्रसाद विचारे, रितेश मुरकर, तसेच मुख्य मार्गदर्शक संतोष मोहिते यांचे अभिनंदन होत आहे.