अरुणशेठ भगत यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी आमदार चषक 2020 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत चावणे आणि मोहो येथे सामने रंगत आहेत. या ठिकाणी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रविवारी (दि. 19) भेट दिली.
पनवेल तालुक्यातील चावणे येथील मैदानावर न्यू स्टार व जय हनुमान क्रिकेट संघांच्या वतीने आणि मोहो येथे श्री गणेश युवक मित्र मंडळाच्या सौजन्याने बैलगाडी शर्यत मैदानावर आमदार चषक 2020 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांना भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत खेळाडूंंना शुभेच्छा दिल्या. तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, ज्येेष्ठ नेते शांताराम पाटील, माजी सरपंच व विभागीय अध्यक्ष किरण माळी आदी सोबत होते.