Breaking News

कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील गीतगंधाली

‘रयत’च्या शताब्दी वर्षानिमित्त सांगीतिक कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त संस्थापक कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कृत आणि संभाजी पाटील प्रस्तुत गीतगंधाली संगीतमय कार्यक्रम मंगळवारी (दि. 21) रंगला. ‘रयत’च्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित हा एकमेव संगीतमय कार्यक्रम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून 100 शाळांमध्ये सादर करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा 51वा प्रयोग मंगळवारी कामोठे येथे प्रा. संभाजी पाटील यांनी सादर केला.
या कार्यक्रमास ‘रयत’चे बाळासाहेब कारंडे, रायगड विभागीय निरीक्षक संजय मोहिते, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, डॉ. निकम, मुख्याध्यापक स्वप्नाली म्हात्रे, प्रतीका दास यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply