पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्था अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त रायगड विभाग कामोठे पनवेल आयोजित कृतज्ञता सप्ताह अंतर्गत रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील श्रवण वामन कदम 12 वी आर्ट्स याने प्रथम क्रमांक पटकावला.
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लाकेनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रोख 3000 रुपये व सन्मानचिन्ह देऊन त्यास गौरविण्यात आले, तसेच आकांक्षा सिंग 11 वी सायन्स या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पारितोषिक रक्कम 1000 रुपये व सन्मानचिन्ह देऊन तिचा गौरव करण्यात आला. दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक अजित सोनवणे, पर्यवेक्षिका स्वाती पाटील, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …