Breaking News

नाशिकमध्ये भीषण अपघात

एसटी-रिक्षा धडकून विहिरीत कोसळल्या; सात जण ठार

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधील देवळा येथे मंगळवारी (दि. 28) बस आणि रिक्षाची जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने एका विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात सात जणांचा मृत्यू, तर 19 जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती. बसचा टायर फुटल्याने तिची अ‍ॅपे रिक्षाला धडक बसली. त्यानंतर बस आणि रिक्षा दोन्ही विहिरीत कोसळल्या. मालेगाव-देवळा रोडवरील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात हा भीषण अपघात घडला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply