Breaking News

थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा; सायना, श्रीकांत दुसर्‍या फेरीत

बँकॉक : वृत्तसंस्था

स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि माजी नंबर वन किदाम्बी श्रीकांत यांनी थायलंड ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत सलामीला विजय मिळवून दुसरी फेरी गाठली. कश्यपने मात्र मांसपेशींच्या दुखण्यामुळे सामन्यातून माघार घेतली. सायनाने मलेशियाची प्रतिस्पर्धी सेल्वादुरारे किसोना हिचा 21-15, 21-15 ने पराभव केला, तर श्रीकांतने आपलाच सहकारी सौरभ वर्मा याच्यावर  21-12, 21-11 अशा गुणफरकाने मात केली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता कश्यप तिसर्‍या गेममध्ये 8-14 असा पिछाडीवर होता. त्याचवेळी त्याला मांसपेशींचा त्रास सुरू झाला. कॅनडाच्या न्थोनी हो शू याच्या विरोधातील पहिला गेम कश्यपने 9-21ने गमावला. त्यानंतरच्या गेममध्ये त्याने 21-13ने बाजी मारुन लढत 1-1 अशी बरोबरीत आणली होती. पुरुष दुहेरीत सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने एक गेम गमाविल्यानंतरही मुसंडी मारून कोरियाची जोडी किम जुंग आणि ली योंग डाए यांच्यावर 19-2,21-16 आणि 21-14 अशी मात करीत  सलामीचा सामना जिंकला. अर्जुन एम. रामचंद्रन आणि ध्रुव कपिला या जोडीला मलेशियाचे ओंग यू सिन आणि टियो ई यी यांनी 13-21,21-8,24-22 ने पराभूत केले. मिश्र दुहेरीत सिक्की रेड्डी सुमीत रेड्डी पहिल्या सामन्यात पराभूत होऊन बाहेर पडले आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply