Breaking News

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

पनवेल : वार्ताहर  : पनवेलजवळील तळोजा येथील अकुप्रिन्ट सिस्टिम्स , ए डिव्हिजन ऑफ हुतामकी या कंपनीने कॉपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत चिंध्रण आणि करवले या गावाच्या सरकारी शाळांमध्ये मुलांना शिक्षण, आरोग्य, आणि स्वच्छतेकडे लक्ष देत आरओ वॉटर प्युरीफायस, वर्गखोल्या, लेखन बोर्ड आणि डेस्कटॉप व प्रोजेक्टर या गावातील शाळेना प्रदान केले आहे.

आपली कंपनी ज्या परिसरात कार्यरत आहे त्या परिसरातील आपली सामाजिक जबाबदारी जपतानाच सुरक्षेचेही महत्व हि या दोन शाळेतील विद्यार्थ्यांना या कंपनीने सांगितले आहे. आपण जर आपली सुरक्षा केली तर आपल जीवन सुखमय होईल. सेफ्टी सीएसाआर अंतगत तळोज्यातील वुदधाश्रमात स्टेनलेस स्टील रेलिंग आणि अग्निशमक उपकरण प्रदान केले. अंबुबॅग्स ह्या जीवनरक्षक म्हणून ओळखल्या जातात. आगीच्या धुरामुळे आणि आपत्कालीन परिस्थितीत सकारात्मक दाब निर्माण करून वायुजीवन प्रदान करू शकतात.

या स्तुत्य उपक्रमांमध्ये कंपनीचे कंपनी प्रमुख राजेश महातपुरे, मानवी संसाधने प्रमुख सिद्धाथ मसुरकर, अनिल शर्मा, नितीन घोडके व सचिन चव्हाण असे कंपनीतील इतर विभागाचे प्रमुख हि उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply