Breaking News

खारघर स्वप्नपूर्ती वसाहतीचे निर्जंतुकीकरण

नवी मुंबई : प्रतिनिधी – खारघर इथल्या सेक्टर 36 परिसरातील स्वप्नपूर्ती संकुलात निर्जंतूकीकरणाची मोहिम राबवण्यात आली. पाच एकरमध्ये हे संकुल पसरलेले असून तीन हजार फ्लॅट्स आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने संपुर्ण वसाहतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. 

पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे सर्वत्र निर्जुंतूकीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. स्वप्नपूर्ती संकुलामध्ये गुरुवारी सकाळी 10 पासून पनवेल महानगरपालिका अग्निशमन दलाच्या गाडीच्या मदतीने सुरु झालेली ही मोहीम दुपारी दिड वाजेपर्यंत सुरु होती. या अंतर्गत अल्प उत्पन्न गटाच्या 32 इमारती तर अत्यल्प गटाच्या 22 इमारतींचे संपुर्ण निर्जुंतूकीकरण करण्यात आले. या इमारतीसोबत सर्व परिसरात निर्जंतूक फवारणी करण्यात आली.  पनवेल महानरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक  आयुक्त श्याम पोशेट्टी, आरोग्य निरीक्षक शैलैश गायकवाड, दौलत शिंदे, फवारणीचे मुख्य आरोग्य निरीक्षक संजय जाधव, जितेंद्र मडवी आणि पंढरीनाथ पाटील यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. स्वप्नपुर्ती संकुलातील रहीवाशांनी या बाबत समाधान व्यक्त केले आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याअंतर्गत सर्वत्र पालिकेच्या वतीने निर्जतूंक फवारणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आले.

– जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply