Breaking News

मोहोपाड्यात पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम

ग्रामपंचायतीकडून वनराई बंधार्‍यासाठी श्रमदान

मोहोपाडा : प्रतिनिधी : वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तलेगाववाडी गावालगतच्या नदिवर ग्रामपंचायतीच्या पाणी आडवा आणि पाणी जिरवा या उपक्रमाअंतर्गत वासांबे ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी श्रमदान करून वनराई बंधारा बांधला. या बंधार्‍यांमुळे शेतकरी वर्गाला आपले फळभाज्यांचे मळे करण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांसह वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे शेतकरीवर्गाने आभार मानले.

तलेगाववाडी गावाजवळून जाणार्‍या नदिच्या पाण्यावर शेतकरी आपले मले, पालेभाज्या आदींचे पिक घेतो. तसेच आसपासच्या परिसरातील गुरे पिण्याच्या पाण्यासाठी या पाण्याचा वापर करतात.परंतु फेब्रुवारी महिना लागताच या नदिच्या पाण्याची पातळी कमी होत गेल्याने शेतकरी वर्गासमोर समस्या निर्माण होतात. याकरिता वासांब-मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी एकत्रित येऊन तलेगाववाडी नदिवर वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान केले.

या वेळी सरपंच पवार, उपसरपंच राकेश खारकर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे, माजी उपसरपंच दत्ता शिंदे, सदस्य स्वप्निल राऊत, ग्रामपंचायत इंजिनिअर उत्तम माळी आदींसह सदस्य व कर्मचार्‍यांनी हातात घमेल, फावडे, टीकाऊ घेऊन श्रमदान केले. या बंधार्‍यामुळे डोंगरमाथ्यावरुन येणारे पाणी अडविण्यात आले असून या पाण्याचा वापर शेतकरी वर्गाला व्यवस्थितरित्या  होणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय बडे यांनी बोलताना सांगितले.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply