
पनवेल ः वार्ताहर
सामाजिक कार्यकर्ते तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिल्यानंतर आंबेडकरी चळवळीचे कार्य करणार्या स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. रायगड जिल्ह्यातील विविध प्रश्न, समाज बांधवांना येणार्या अडीअडचणी व त्यावरील उपाय, जिल्ह्यातील इतर पक्षांची राजकीय वाटचाल या संदर्भात साधकबाधक चर्चा केली व येत्या काही दिवसात महेश साळुंखे हे स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत व हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांच्या उपस्थितीत पनवेल येथे होणार आहे.