
पनवेल : भाजपच्या युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी मयुरेश नेतकर यांची नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेतकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, सुशांत मोहिते आदी उपस्थित होते.
ठिकठिकाणच्या शंकराच्या मंदिरात भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची भेट




पनवेल : तालुक्यात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त चिंध्रण, तळोजे मजकूर, खुटारी तसेच ठिकठिकाणच्या शंकराच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शिरवली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, आनंद ढवळे, अशोक साळुंके आदी उपस्थित होते.