Breaking News

दीपक गुरव यांनी शब्द पाळला; उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा

पेण : प्रतिनिधी

पक्षांतर्गत झालेल्या समझोत्यानुसार पेणचे उपनगराध्यक्ष दीपक गुरव यांनी शनिवारी (दि. 30) आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्याकडे दिला. या वेळी नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, अजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी माझ्यावर विश्वास दाखवून  मला उपनगराध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. त्यांना दिलेल्या शब्दानुसार मी आज तीन वर्षांनंतर आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा स्वखुशीने देत असल्याची माहिती या वेळी दीपक गुरव यांनी दिली. दीपक गुरव 2 जानेवारी 2017 रोजी पेण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदावर विराजमान झाले होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply