उरण : वार्ताहर
महाशिवरात्रीनिमित्त उरण तालुक्यातील महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाची पूजा करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. ओम नम: शिवाय… या जयघोषाने उरण तालुक्यात भक्तांनी ठिकठिकाणी शंकराच्या मंदिरात जाऊन भक्तांनी शिवलिंगावर बेल, बेल फुल, नारळ, दुध वाहून यथासांग पूजा केली. तालुक्यातील घारापुरी, केगाव येथील माणकेश्वर, जेएनपीटीजवळील शेव्याचे महादेव मंदिर, देऊळवाडी येथील संगमेश्वर, रेल्वे स्टेशन येथील निलकंठेश्वर, बोरी गावातील होणेश्वर मंदिर आदी ठिकाणी भक्तांनी रांगा लावून दर्शन घेतले. माणकेश्वर येथे मंदिराचे विश्वस्त शैलेंद्र म्हात्रे व कार्यकारिणी सदस्य यांनी भक्तांना दर्शन घेण्यासाठी सोय केली होती. शेव्याचे शंकर मंदिर येथे पुजारी संतोष दर्णे यांनी उत्तम सोय केली होती.