Breaking News

तंदुरुस्त भारत अभियानामध्ये सीकेटी महाविद्यालयाचा सक्रीय सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान  महाविद्यालय, खांदा कॉलनीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्रीय क्रीडा दिनी केलेल्या तंदुरुस्त भारत अभियानामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला.

देशातील जनतेला तंदुरुस्त राहण्यासाठी चालू झालेल्या या अभियानामध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी व इतर विद्यार्थ्यांनी तंदुरुस्त राहण्याची शपथ घेतली. कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिन व तंदुरुस्त भारत अभियानाचे महत्त्व विषद केले, तसेच भारताच्या वेगवेगळ्या मैदानी खेळाचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply