पनवेल : फेसबुकवर बनावट अकाऊंट ओपन करून एका तरुणीची बदनामी करणार्या आरोपीला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. सागीर खान (वय 25) व रमेश मंगल ठाकूर (वय 23) असे या आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी पनवेलमधील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. तालुक्यातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणीची सागीर खान (वय 25) याच्याशी ओळख झाली होती. दोघेही झारखंड येथील आहेत. सागीर व या तरुणीची फोनवर चटिंग सुरू असे. काही दिवसांनी या तरुणीने चटिंग करणे बंद केल्याने याचा राग सागीर खान यास आला. त्याने या तरुणीचे फेसबुकवर बनावट अकाऊंट ओपन केले. व त्यात तिचा मोबाइल नंबर प्रसिद्ध करून तिच्या संदर्भात अश्लील माहिती दिली. आणि ते व्हायरल केले. याबाबतची तक्रार दाखल करताच तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सतीश जाधव यांनी तांत्रिक तपास करत आरोपी सागीर खानसह त्याला मदत करणारा रमेश मंगल ठाकूर (वय 23) या दोन आरोपींना झारखंड येथून अटक केली.
Check Also
स्व. गंगादेवी बालदी यांची शोकसभा; मान्यवरांकडून श्रद्धांजली
उरण : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे नुकतेच …