पनवेल : रामप्रहर वृत्त
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती व शहीद दिनाचे औचित्य साधून पनवेल येथील जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत रा. जि. प.च्या प्राथमिक रिटघर, उसर्ली आणि चिंचवली शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे (परीक्षा पॅड) वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास ‘जाणीव’चे शरद भोपी भानुदास वास्कर, चिंतामण पाटील, अनिष पाटील, संदीप म्हात्रे, सार्थक वास्कर, साहस वास्कर, स्वरा ठाकूर, सुनील ठाकूर आदी सभासद, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.