Breaking News

चिरनेरमध्ये नाल्याच्या कामाला सुरुवात

चिरनेर : रामप्रहर वृत्त

दरवर्षी चिरनेर गावाला पुरपरिस्थिला कारणीभूत ठरत असलेल्या मध्यवर्ती मुख्य नाल्याचे खोलीकरण, रूंदीकरण, बांधबंदिस्थी आणि मजबूतीकरणाच्या कामाला जोरदारपणे सुरूवात झाली आहे. शासनाच्या आपात्कालीन यंत्रणेकडून या ओढयाची पहाणी करून देेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना आमदार महेश बालदी व भाजपचे ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश फोफेरकर यांच्या प्रयत्नातून एमएमआरडीएने या नाल्याच्या कामासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजुर केला. आणि तत्कालिन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते 9 ऑगस्ट 2019 रोजी या नाल्याच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले होते. पण यावर्षी पाऊस अधिक काळ लांबल्याने या कामाची सुरुवात आता झाली आहे.

चिरनेर मुक्तीधाम स्मशानभूमी ते चिरनेर येल्याची खाडीपर्यंत या नाल्याचे काम होणार असून, या नाल्याच्या नुतनीकरणाची लांबी 1200 मीटर अशी आहे. तर नाल्याची रूंदी साडेपाच ते सहा मीटर असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. या नाल्याचे नुतनीकरण व मजबूतीकरणाच्या कामामुळे या नाल्यातून पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग आता सुकर होणार आहे.

हे काम एका नामांकित असलेल्या पी. पी. खारपाटील कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले असून, ते युध्दपातळीवर सुरू आहे. 50 कामगार या कामासाठी दररोज राबत आहेत. जवळ-जवळ 40 टक्के काम पुर्ण झाले असून, उर्वरीत काम जून 2020 पर्यंत पुर्ण करण्याचा संकल्प आहे. पुरसद़ृश्य परस्थितीमुळे नाल्याच्या मजबूतीकरणाचा हेतू स्वच्छ असून संबंधित कंपनीकडून नाल्याचे बांधकाम करतांना ते प्रामाणिकपणे केले जात असल्याचे समोर आले आहे. नाल्याचे मजबुतीकरण करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू असून, लवकरच हे काम मार्गी लावण्यात येईल.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply