उरण : रामप्रहर वृत्त
उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची शोकसभा रविवारी (दि. 16) उरण येथे रविवारी झाली. या शोकसभेत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भाजपचे रायगड जिल्हा संपर्कमंत्री आशिष शेलार, पंढरपूरचे आमदार समाधान औताडे यांनी सोमवारी आमदार महेश बालदी यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्व. गंगादेवी यांना आदरांजली अर्पण केली व बालदी परिवाराचे सांत्वन केले. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
गंगादेवी बालदी यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांची शोकसभा उरण बोरी रोड येथील यूईएस स्कूलमध्ये रविवारी झाली. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली.
या शोकसभेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, उरणच्या माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, भाजप शहराध्यक्ष कौशिक शाह, अशोक बालदी, राधिका बालदी, स्नेहा बालदी, शुभम बालदी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
Check Also
खारघरमध्ये आरोग्य तपासणी शिबिर
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थितीखारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सेक्टर 20 मधील हावरे …