पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित यांच्या विद्यमाने आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांचा इमारतींचा स्वयं पुनर्विकास या विषयावर मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवारी (दि. 23) सकाळी 10 वाजता पनवेल शहरातील विरुपाक्ष हॉल येथे होणार आहे.
या शिबिराला मार्गदर्शक म्हणून विधान परिषदेतील भाजप गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, सहकारी संस्था पनवेल सहाय्यक निबंधक भारती काटूळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
गृहनिर्माण संस्था आणि रहिवाशांना स्वयं पुनर्विकासाच्या संकल्पनेची सखोल माहिती मिळावी, पुनर्विकास प्रक्रियेत येणार्या अडचणी, योजना आणि इतर विषयांवर या शिबिरात मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे शिबिराचा गृहनिर्माण संस्था व रहिवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादितचे अध्यक्ष कुंडलिक काटकर, सल्लागार व माजी नगरसेवक नितीन पाटील, सचिव भरत मोरे यांनी केले आहे.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper