Breaking News

लवे नोडमधील सिद्धार्थ दासचा दोरी उडीत विश्वविक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उलवे नोडमधील सिद्धार्थ संतोष दासने दोरी उडीत विश्वविक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिद्धार्थचे विशेष अभिनंदन केले.
सिद्धार्थ दासने अवघ्या एका मिनिटात 274 वेळा उलट्या दिशेने दोरीवर उड्या मारल्या. हा विश्वविक्रम त्याने 11 फेबु्रुवारी रोजी केला. त्याच्या या अद्भूत कामगिरीमुळे उलवे नोड, पनवेलसह रायगड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली असून क्रीडाविश्वात त्याचे कौतुक होत आहे.
सिद्धार्थच्या या यशाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आहे. या वेळी सिद्धार्थसोबत त्याचे वडील संतोष दास आणि आई शंपा दास हेही उपस्थित होते.

Check Also

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून जिज्ञासा कडूला उच्च शिक्षणासाठी पाच लाखांची आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्तवैद्यकीय शिक्षणासाठी पनवेल येथील जिज्ञासा कडू हिला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply