पनवेल ः रामप्रहर वृत्त
सावळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एचआयएल कंपनीच्या केमिकल्समुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना आरोग्यविषयक अनेक तक्रारी सातत्याने जाणवत आहेत. यासंदर्भात सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे यांनी या कंपनीची सोमवारी (दि. 16) पाहणी केली. पातळगंगा नदी प्रदूूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. तरीसुद्धा कंपनी प्रशासनाला जाग येत नसल्याने माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे यांनी या कंपनीची पाहणी केली. सरपंच शिवाजी माळी, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू माळी, प्रमोद भोईर यांच्यासह नागरिक सोबत होते. त्यांनी उपाययोजनेची मागणी केली.