Breaking News

कळंबोली भाजप कार्यालयात मोफत नेत्रचिकित्सा शिबिर उत्साहात

कळंबोली : रामप्रहर वृत्त

कळंबोली येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये अनिल आय हॉस्पिटल डोंबिवली यांच्या वतीने दोन दिवस मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. डॉ. कृष्णा धनवडे व मोहिनी धनवडे यांनी यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचा भाजप कार्यालयामध्ये तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी भाजप भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, कळंबोली शहर उपाध्यक्ष दिलीप बिस्ट यांनी त्यांचा सत्कार केला. कार्यालय चिटणीस जगदिश खंडेलवाल हेही उपस्थित होते. दोन दिवसांमध्ये 147 लोकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली आणि अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. भाजपच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम कळंबोलीकरांसाठी आयोजित केले जातात आणि लोकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. अशा  शिबिरांतून जनतेची चांगल्या प्रकारे सेवा होणार आहे, असे या वेळी दिलीप बिस्ट यांनी सांगितले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply