Breaking News

रामवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात

पेण ़: प्रतिनिधी

रामवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचा सहावा वर्धापन दिन संघाचे अध्यक्ष स. रा. म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पेण येथील आगरी समाज हॉलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेल्या संघाच्या वटवृक्ष या स्मरणिकेचे प्रकाशन सोबती संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब नेने यांच्या हस्ते

करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वंदे मातरम् शाळेच्या विद्यार्थ्यांनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रा. वि. ठाकूर यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेचे अध्यक्ष स. रा. म्हात्रे यांनी ज्येष्ठ नागरिकांना श्रेष्ठत्व दाखविण्याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी संघाच्या सभासदांचे वाढदिवस त्याचप्रमाणे 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांचा व लग्नाला 50 वर्षे पूर्ण झालेल्या दाम्पत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म. ह. पाटील यांनी केले. नगराध्यक्षा प्रीतम पाटील, नगर परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती दर्शन बाफना, उद्योजक नारायण ठाकूर आदी मान्यवरांसह संघाचे पदाधिकारी, सभासद या कार्यक्रमाला उपस्थित होते. संघाचे कोषाध्यक्ष ना. कृ. म्हात्रे यांनी आभार मानले. पसायदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply