Breaking News

महायुतीच्या प्रचाराने तळोजा दणाणले!

तळोजा ः रामप्रहर वृत्त

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ अनेक ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील तळोजा फेज 1 येथे रविवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार रॅलीदरम्यान सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ तळोजा फेज 1 येथे प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, निर्दोश केणी, प्रभाकर जोशी, वासुदेव घरत, संतोष पाटील, विनोद घरत, मुरलीधर म्हात्रे, बाला मुंबईकर, मंसुर पटेल, गोपीनाथ पाटील, मुनाफ पटेल, अरबाज पटेल, शेपी पटेल, वसीम पटेल, शाहिन पटेल, इमरान पठाण यांच्यासह भाजप, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

एक दिग्दर्शक, एक वर्ष, चार चित्रपट, सर्वच सुपर हिट; मनमोहन देसाईंची कम्माल…

दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या चित्रपटात इतकं आवडण्यासारखे काय असते? माहीत नाही. याचा अर्थ त्याबाबत अज्ञान आहे …

Leave a Reply