अलिबाग : जिमाका : जे नागरिक 1 ते 23 मार्चदरम्यान परदेश प्रवास करून रायगड जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशील जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे.
एकूण परदेश प्रवासावरून जिल्ह्यात परतलेले नागरिक 935, परदेशी प्रवास करुन परतल्यानंतर 14 दिवसांचा इन्क्युबेशन कालावधी पूर्ण केलेले वा पुन्हा परदेशी परतलेले नागरिक 187, घरामध्ये अलगीकरणात (होम क्वारंटाईन) असलेले नागरीक-651, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) असलेले नागरिक 95 आहेत.
मुंबई येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल नागरिक 1 असून या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे, तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल नागरिक 1 असून, या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे.
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 26, तपासणी केल्यानंतर स्वॅब टेस्टिंग न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 8, स्वॅब तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या 18, तपासणीअंती निगेटीव्ह रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या 16, तर तपासणीअंती पॉझिटीव्ह रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या 2 आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.