रोहे ः प्रतिनिधी : कोरोना जगभर थैमान घालत आहे. देशातही कोरोनाचे रुग्ण सापडल्याने संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या काळात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न चालू असताना रोह्यात मात्र खेरदीच्या नावावर काही हवसे, नवसे व बघ्यांची गर्दी होताना दिसत आहे, तर दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळे पोलीस त्रस्त आहेत.
आत्यवश्यक वस्तू खरेदीसाठी बुधवारी सकाळी बाजारपेठेत रोहेकारांची गर्दी दिसून आली. भाजपाला, किरणा माल, दुध, औषधे खरेदी करण्यासाठी नागरिक बाहेर पडले होते. पोलीस यंत्रणा ठिकठिकाणी तैनात असून, शहारातून गस्तही घालत आहेत. याचबरोबर पोलीस हे जिपमधून फिरून गर्दी न करण्याचे आवाहन करीत आहेत. असे असले तरी मेडिकल, भाजीपाला, किरणा माल, दूध आदी ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. या नागरिकांची गर्दी आहेच, शिवाय विनाकारण फिरणारे हौसे, नवसे व बघ्यांची संख्या वाढती होती.