Breaking News

 पनवेलमध्ये नाट्य रसिकांना एकांकिकांची मेजवानी 

मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला प्रारंभ

पनवेल : प्रतिनिधी

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला आजपासून (दि. ०२) पनवेलमध्ये प्रारंभ झाला असून या महाअंतिम फेरीचे उदघाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रसिद्ध लेखक, निर्माते व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे,  अभिनेते, लेखक व दिग्दर्शक अभिराम भडकमकर,  अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक विजय गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, स्पर्धा प्रमुख व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, अभिनेते भरत सावले, माजी उपमहापौर सीता पाटील, चारुशीला घरत, अतुल पाटील, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, राजू सोनी, विकास घरत, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, प्रज्ञा प्रकोष्ठचे जिल्हा संयोजक डॉ. मयुरेश जोशी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, खजिनदार अमोल खेर, गणेश जगताप, चिन्मय समेळ, संजीव कुलकर्णी, निखिल गोरे, अक्षय सिंग यांच्यासह टीम अटल करंडक, स्पर्धक व नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“रंगमंच आमचा… कलाविष्कार तुमचा”  हे ब्रीद वाक्य घेऊन  गेली १५ वर्ष पनवेल मध्ये एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आधी सात वर्ष ही स्पर्धा “मल्हार करंडक” या नावाने जिल्हास्तरीय स्वरूपात आयोजित केली जात होती. आता गेली आठ वर्ष ही स्पर्धा “अटल करंडक” या नावाने राज्यस्तरीय स्वरूपात आयोजित केली जात आहे. नाटय चळवळ वॄद्धींगत व्हावी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे आणि त्या अनुषंगाने त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे हि स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यस्तरीय विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. या स्पर्धेचे प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप आहे.

अटल करंडक एकांकीका स्पर्धेमध्ये एकूण रुपये २ लाख ७५ हजार रुपये रक्कम स्वरूपात पारितोषिके असून ज्येष्ठ कलावंत, रंगकर्मी जयंत सावरकर यांचा ‘गौरव रंगभूमीचा’ या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पनवेल मधील दिवंगत लोकप्रिय नाट्य कलावंत व वेशभूषाकार कै. किशोर जोशी ह्यांच्या स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट वेशभूषा हा विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. गेली आठ वर्षे चाललेल्या या स्पर्धेने टप्प्याटप्प्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. कोरोना काळातही एवढ्या मोठया स्तरावर अटल करंडक ही एकमेव स्पर्धा होती, जी संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वीरीत्या संपन्न झाली.  यावर्षी देखील अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला प्राथमिक फेरीसाठी ११५ हुन अधिक संघांनी सहभाग घेतला आहे. त्यामधून महाअंतिम फेरीसाठी सर्वोत्कृष्ट अशा २५ एकांकिकांची निवड झाली आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. ०२) शोधयात्रा (सहज प्रोडक्शन, पुणे), नातीचरामी (फ्रायडे फिल्म्स, अलिबाग),   थँक्यू – (आर डी क्रिएशन्स, मुंबई), गोदा – (माय नाटक कंपनी, मुंबई ), ओल्या भिंती (कलासक्त, नाशिक), रंगा येई हो (इष्ट मन कलर, पुणे), बारम – (एम.डी. कॉलेज, मुंबई), अशांती पर्व (याज्ञसेन रंगभूमी, नाशिक), प्रवास- (भवन्स महाविद्यालय, मुंबई) या नऊ एकांकिकांचे सादरीकरण होते.

शनिवारी (दि. ०३) या एकांकिकांचे होणार सादरीकरण 

गाभारा (मोर्डेन कॉलेज शिवाजी नगर- पुणे),  अन्नपूर्णा हाजीर हो- (रंगवेद- मुंबई), अजूनही चांदरात आहे- (ब्लॅक कर्टन- मुंबई), कम्युनिकेशन एरर (निर्मिती नाट्यसंस्था-सातारा), कुपान (गोगटे जोगळेकर महाविद्यालय-रत्नागिरी), कंदील (मुजी जेठा महाविद्यालय- जळगाव),  हेड स्टडी (बॅकस्टेज वाला ग्रुप- पनवेल), आखाडा(एकदम कडक-मुंबई), उकळी – (कीर्ती कॉलेज- मुंबई ),

 

     रविवारी(दि. ०४) या एकांकिकांचे होणार सादरीकरण 

डोक्यात गेलंय (सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय- ठाणे),  फ्लाइंग राणी- (कलामंथन- ठाणे ), लपंडाव (डॉ. पिल्लई कॉलेज- पनवेल), टिनीटस- (कलरफुल माँक- मुंबई), तुंबई (सी. के. ठाकूर (स्वायत्त) महाविद्यालय- पनवेल),   डोन्ट क्विट- (स्वप्नपूर्ती क्रिएशन्स- मुंबई),  काहीतरी अडकलंय- (गुरु नानक खालसा स्वायत्त्य महाविद्यालय- मुंबई)

Check Also

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …

Leave a Reply