मोहोपाडा ः प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रसायनी परिसरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आशिष जाधव यांनी रविवारी (दि. 16) मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत विविध सामाजिक संघटनांसह मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते. सेबी रोड येथून मिरवणुकीची सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, भगवान बुद्धांचा विजय असो, छत्रपी शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. नवीन पोसरी येथे निळ्या झेंड्याचे ध्वजारोहण आरपीआयचे शशी भालेराव यांच्या हस्ते झाले. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. डॉ. आंबेडकर भवन येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.