Breaking News

कोरोना रोखण्यासाठी भाजप कार्यरत

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने प्रतिबंधात्मक फवारणी

पनवेल : वार्ताहर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी प्रभाग क्रमांक 18 परिसरासाठी अ‍ॅण्टी कोरोना फवारणी तसेच तेथील रहिवाशांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी जास्त लांब जाण्याची आवश्यकता पडू नये, यासाठी जनसंपर्क कार्यालयाजवळ भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले आहे. महानगरपालिकेचे क्षेत्र फार मोठे असल्याने प्रत्येक मजल्यावर फवारणी करणे शक्य होत नाही. प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीपोटी प्रत्येक बिल्डींगमध्ये कार्यकर्त्यांच्या साथीने जाऊन प्रत्येक घराच्या दारापर्यंत अ‍ॅण्टी कोरोना (सोडीयम हायपोक्लोराईड) फवारणी विक्रांत पाटील करून घेत आहेत. तसेच शासनाच्या आदेशानुसार नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी भाजीपाला खरेदीसाठी प्रभाग क्रमांक 18 येथील जनसंपर्क कार्यालयाजवळ भाजीपाला विक्रीची व्यवस्था त्यांनी केली आहे. तसेच 9029467473 या क्रमांकावर रहिवासी आपल्या भाजीची ऑर्डर (आपले नाव व पूर्ण पत्त्यासह) आदल्या दिवशी व्हॉट्सअ‍ॅप केल्यास त्यांना होम डिलिव्हरी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती विक्रांत पाटील यांनी दिली आहे. सर्वांनी एकत्रित येऊन घरातच थांबून कोरोनाला हद्दपार करायचे आहे. तरी सर्वांनी पनवेल महानगरपालिका, पोलीस ठाणे व पनवेल उपजिल्हा रुग्णालय यांना सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply