नगरसेवक नितीन पाटील यांचा पुढाकार
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/04/Nitin-Patil-1024x484.jpg)
पनवेल : वार्ताहर
वाढत्या रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील रहिवाश्यांच्या मागणीनुसार स्थानिक नगरसेवक नितीन पाटील यांनी खाजगी प्लॉटमध्ये झाडीझुडपे व साठलेल्या कचर्याची स्वच्छता करून घेतली आहे. या प्रभागातील वरद, विनायक सोसायटीच्या समोरील उघड्या जागेवर साचलेला कचरा जेसीबीच्या साहाय्याने साफ करून घेतला. या वेळी नगरसेवक नितीन पाटील, भाजप पनवेल शहर सोशल मिडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, प्रभाग अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजय डिसोझा, कार्यकर्ते व महानगरपालिकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.