Breaking News

पत्रकार संघटनेकडून गरजूंना मदतीचा हात

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्या घरात सुरक्षित राहणे हा एकमेव पर्याय आहे. लॉकडाऊन परिस्थितीमध्ये हातावर पोट असणार्‍यांसाठी मात्र जगणे अत्यंत अवघड बनले आहे. लॉकडाऊन परिस्थितीमध्ये उदरनिर्वाहाचा प्रश्न ज्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी पनवेलची तालुका पत्रकार विकास मंच ही संस्था धावून गेली आहे. रसायनी विभागातील कष्टकरी नगर येथील गोरगरीब जनतेला पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि पार्श्व वूमन या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 6) धान्यवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सचिव हरेश साठे, कार्यकारिणी सदस्य अनिल भोळे, पत्रकार दीपक घोसाळकर, पत्रकार आनंद पवार, ग्रामपंचायत तुराडेच्या सदस्य गुरुबाई राठोड, सदस्य विश्वनाथ गायकवाड, सुनील राठोड, दादासाहेब अटपाडकर, अशोक सोनावणे, राजू पवार, रवी राठोड, गणेश सोनावणे आदी उपस्थित होते. याबाबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील म्हणाले की, आज परिस्थिती फार बिकट बनली आहे. विषाणूचे संक्रमण आटोक्यात आणले नाही तर लॉकडाऊनचा कालावधी वाढू देखील शकतो. अशा परिस्थितीमध्ये गरीब जनतेचे हाल होऊ नयेत. त्यांच्या मदतीकरिता आम्ही आमचे खारीचे योगदान दिले आहे. अशाचप्रकारे सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन हातभार लावल्यास कोरोना विषाणूविरुद्ध ही लढाई आपण विनासायास जिंकू.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply