Breaking News

खोपटा पूलनजीकच्या रस्त्यावर अपघात; वाहनचालक जखमी

उरण ः प्रतिनिधी

उरण तालुक्यातील पूर्व विभागाला जोडणार्‍या खोपटा पुलापलीकडील कोष्टल रस्त्यावर सकाळी 11 वाजता दोन चारचाकी गाड्या रस्ता पार करीत असताना व्यागनार कारचालकाने गाडीला अचानक ब्रेक दिल्याने कार रस्त्यावर उलटली. या वेळी रस्त्यातून जात असलेल्या अनोळखी

वाहनचालकांनी हा अपघात पाहून तत्काळ वाहनचालकाला बाहेर काढले. तसेच उलटलेली वॅगनार कार पादचार्‍यांनी पूर्वस्थितीत उभी करून चालकास धीर दिला. मात्र अपघात कशामुळे झाला हे पाहण्यासाठी घटनास्थळी या मार्गावरील पादचारी आणि वाहनचालकांनी मोठी गर्दी केली होती. वाहनचालक किरकोळ जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी पाठविण्यात आले. मागील दोन वर्षांपासून हा रस्ता अपघातांचा कर्दनकाळ बनला असून, या मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याने चारी बाजूला तत्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी या मार्गावरील वाहनचालक आणि पादचार्‍यांनी केली आहे.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply