Breaking News

माणगावात भरला कोकण खाद्य महोत्सव; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

माणगाव : प्रतिनिधी

कोकण मेवा शॉपीतर्फे माणगावमध्ये कोकण खाद्य महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर रविवारी (दि.1) करण्यात आलेल्या या महोत्सवात गेले दोन दिवस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. माणगाव शहरातील कमल फर्निचरशेजारी भरविण्यात आलेला हा महोत्सव 8 मे पर्यंत चालणार आहे. या खाद्य महोत्सवात कोकणातील दर्जेदार खाद्य पदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे.  महिला बचत गटांची उत्पादने, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील नामांकित कंपन्यांची दर्जेदार उत्पादने, देवगड व रत्नागिरीचा जगप्रसिद्ध हापूस आंबा, विविध प्रकारचे काजू, पेणचे प्रसिद्ध पापड यांच्यासह इतर बरेच खाद्यपदार्थ या महोत्सवात ठेवण्यात आले आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply