Breaking News

कोरोनाविरोधात लढण्यासाठी पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवकांंचा पुढाकार

दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीत

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाविरोधात लढण्यासाठी पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवकांनी आपले दोन महिन्यांचे मानधन महापौर निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवक संजय भोपी, मनोहर म्हात्रे, समीर ठाकूर, चारुशीला घरत, वृषाली वाघमारे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून हा पुढाकार घेतला आहे. त्यांनी याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे.
संपूर्ण जगावर कोरोनाचे आरिष्ट आले असून आपल्या देशातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या महामारीविरोधात प्रशासन, पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि समस्त जनता एकवटली आहे. पनवेल परिसरातही महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणेकडून आणि सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सहकार्यातून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. खबरदारी घेतली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी लागू आहे. त्यामुळे या काळात ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. महापालिकेकडून निवारा कक्ष, जिल्हा कोविड रुग्णालय कार्यरत ठेवण्यात आले आहे. हिवताप तपासणी केंद्रही सुरू झाले आहे. ठिकठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त विविध वैद्यकीय साधने खरेदी करण्यात आली आहेत. आणखी अनेक गोष्टींची आवश्यकता आहे.
पनवेल महापालिका ही नव्याने स्थापन झालेली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाविरोधात लढण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. त्यानुसार महापौर सहाय्यता निधी जमा करण्यात येत आहे. यामध्ये विविध सामाजिक संस्थांना, दानशूर व्यक्तींना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला भाजप नगरसेवकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांनी आपले दोन महिन्यांचे मानधन या निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांना पत्रही देण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त भाजपच्या नगरसेवकांनी गेल्या काही दिवसांत निर्जंतुकीकरण फवारणीपासून विविध कामे करून घेतली आहेत. त्याचबरोबर गोरगरिबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले आहे. कोरोना व्हायरस आणि त्यामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य माणसाला मदतरूपी दिलासा देण्याचे काम केले जात आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply