पनवेल : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जनतेला घरीच राहण्याचे आवाहन केल्यानंतरही मॉर्निंग वॉक करणार्या 12 जणांवर पनवेल पोलिसांनी बुधवारी (दि. 8) सकाळी कारवाई केली. या सर्वांवर 188नुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यात कोरोनाचे 21 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना शासन, प्रशासन, पोलिसांकडून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरीही मॉर्निंग वॉकला गेल्याने 12 जणांवर बुधवारी पनवेल पोलिसांनी कारवाई केली.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …