Breaking News

महिलांसाठी आधार कार्ड शिबिर

नगरसेविका नेत्रा पाटील यांचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

खारघर नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या दिवशी प्रभागातील महिलांसाठी आधार कार्ड शिबिराचे तसेच खारघर पोस्ट ऑफिस यांच्या वतीने सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत नवीन खाते उघडण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

या शिबिरामध्ये अनेक महिला भगिनींनी आपले आधार कार्डमधील पत्त्यात बदल ,नावात बदल, फोटो दुरुस्ती अशा अनेक सुविधांचा लाभ घेतला. महिलांना आपल्या रोजच्या धावपळीत घर कामात वेळ मिळत नसल्या कारणाने खास त्यांच्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे नगरसेविका नेत्रा पाटील यांनी सांगितले. सदर शिबिरात सुमारे 75 ते 80 महिलांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले. 0 ते 5 वयोगटातील 25 मुलामुलींचे नवीन आधार कार्ड बनविण्यात आले. त्याचबरोबर 10 मुलींचे सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडण्यात आले.  शिबिरासाठी मंजू चोप्रा, दीपा पिल्लाई, अर्चना बागल, कुणाल देवकर, गोपाल राजपूत, निरंजन पाटील, वैभव शेजवळ, संदीप एकबोटे, आदित्य हाटगे यांनी मेहनत घेतली.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply