Breaking News

पालिका कर्मचार्यांची रोह्यात आरोग्य तपासणी

रोहे : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहे अष्टमी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार व ठेकेदार याकडे असलेले कामगार नेटाने कार्यरत आहेत. निगराणी, फवारणी, स्वच्छतेचे काम ही मंडळी करीत असल्याने  या सर्वांची आरोग्य तपासणी पालिकेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय व खासगी डॉक्टर यांच्या सहकार्याने करण्या येत आहे. 

शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात दोन दिवस 150 कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आह. या वेेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. अंकिता खैरकर, डॉ. फरिद चिमावकर, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ. किरण म्हात्रे, डॉ. प्रवीण करकरे, डॉ. कदम यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील व खासगी डॉक्टर उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply