Breaking News

मुंबई-गोवा महामार्गावर दोन अपघात

माणगांव : प्रतिनिधी

मुंबई -गोवा महामार्गावर माणगांवजवळ तिलोरे गांवाच्या हद्दीत  बुधवारी (दि. 22) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ईको कारच्या धडकेने पादचारी जखमी झाला. तर  गुरुवारी (दि. 23)  सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गारळ गांवाच्या हद्दीत ट्रेलर व पिकअप जीप यांच्यात समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

हर्षद रविंद्र मोरे (वय 38, रा. रिटनपाडाजवळ जि. ठाणे) हा त्याच्या ताब्यातील इको कार (एमएच-02,सीडी-6110) चालवित मुंबईकडून माणगांवकडे येत होते. तिलोरे गांवाच्या हद्दीत सकुलाल बलवंत जाधव (वय 75, रा. नाणोरे, ता. माणगांव) हे  महामार्ग ओलांडात असताना भरवेगात आलेल्या इको कारने त्यांना ठोकर दिली. या अपघातात सकुलाल जाधव जखमी झाले.

या प्रकरणी रामदास रामचंद्र चव्हाण

(वय 38, रा. नाणोरे, ता. माणगांव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कार चालक हर्षद मोरे याच्या विरुध्द माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरा आपघात माणगांवपासून 3 कि.मी. अंतरावर असलेल्या गारळ गांवाच्या हद्दीत हॉटेल रायगड दर्शनजवळ ट्रेलर व पीकअप जीप यांच्यात झाला.  फुलमान आहमदउल्ला हे त्यांच्या ताब्यातील ट्रेलर (एमएच-46,बीबी-0283) घेवून न्हावाशेवा येथून महाडकडे  जात होते. गुरुवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गारळ गांवाच्याद्दीत त्यांचा ट्रेलर आणि समोरुन आलेल्या पीकअप (एमएच-048,डब्ल्यू-3295)ची समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या दोन्ही आपघातांचा अधिक तपास पोलीस हवलदार मंगेश धुपकर करीत आहेत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply