
उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील माणकेश्वर-दांडा समुद्र किनार्यावर शुक्रवारी (दि. 1) मृत डॉल्फीन मासा वाहून आला आहे. या मृत डॉल्फिन माशाची लांबी साधारणता आठ फूट असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. माणकेश्वर-दांडा समुद्र किनार्यावर मृत अवस्थेत आढळून आलेल्या डॉल्फिन माशाची माहिती येथील केगाव ग्रामपंचायतीने वनविभागाला दिल्यानंतर वन खात्याचे कर्मचारी किनार्यावर पोहोचले आहेत. मृत डॉल्फिनचा पंचनामा करून किनार्यावरच दफन करण्यात येणार असल्याची माहिती उरणचे वनाधिकारी शशांक कदम यांनी दिली आहे.