Breaking News

एपीएम टर्मिनल्सतर्फे मास्क, साबणांचे वाटप

उरण ः प्रतिनिधी

कोविड 19 साथीदरम्यान एपीएम टर्मिनल्स, मुंबई या गेट वे टर्मिनल्स इंडिया (जीटीआय) नावानेही ओळखल्या जाणार्‍या कंपनीने टर्मिनल्स परिसरातील समाजापर्यंत पोहचत मास्क आणि साबणांचे वाटप केले. यामागे सध्याच्या परिस्थितीत अतिशय गरजेची असलेली स्वच्छतेची सवय स्थानिक समाजात रुजवण्याचे उद्दिष्ट आहे.

एपीएम टर्मिनल्स मुंबईतर्फे 45 हजार मास्क आणि तितक्याच साबणांचे वाटप करण्यात आले. गावांच्या सरपंचांकडे मास्क व साबण सोपवण्यात आले असून त्याचे पुढे रहिवाशांना वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून गावकर्‍यांना सभोवताली स्वच्छता राखण्याचे महत्त्व समजावण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाचे संयोजन ऑपरेशन्स प्रमुख अलोक मिश्रा आणि एचआर प्रमुख ईआर अ‍ॅडमिन सुनील सुजी यांनी केले. एपीएम टर्मिनल्स मुंबई नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, जसखार, सोनारी, करळ, सावरखार, बेलपाडा, फुंडे, बोकडवीरा, डोंगरी, पाणजे, धुतूम, पागोटे, घारापुरी आदी गावांत सक्रिय असून तिथे बरेच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे उपक्रम सुरू केले आहेत. कंपनीच्या कर्मचार्‍यांपैकी बहुतेक जण पोर्टजवळील गावांतील असून त्यांच्या कल्याणासाठी झटण्यास एपीएम टर्मिनल्स सतत प्रयत्न करीत असते. टर्मिनल्सने प्री-गेट पार्किंगला भेट देणारे बाहेरचे ट्रकचालक तसेच क्लिनर्सनाही मास्क व साबणांचे वाटप केले आहे. एपीएम टर्मिनल्स, मुंबईचे प्रमुख ऑपरेटिंग अधिकारी गिरीश अगरवाल म्हणाले की, आमच्या टर्मिनल्सभोवतीच्या परिसरात कोरोनाच्या साथीशी लढण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहोत. या अवघड काळात आम्ही सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे असून स्थानिक समाजाला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी तयार आहोत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply