Breaking News

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त
माणसं जपणारे व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस बुधवारी (दि.22) विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, अरुणशेठ भगत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून शांतीवन फाटा ते भोकरपाडा आणि चिपळे भोकरपाडा रस्त्याचे भूमिपूजन, तर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक जिल्हा परिषद सेस फंडातून भानघर ते चिंचवली फाट्यापर्यंत तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे उद्घाटन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे सुकापूर भाजपतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण, दोन रस्त्यांचे उद्घाटन, एका रस्त्याचे भूमिपूजन व स्वच्छतागृहाचे उद्घाटन केले गेले.
या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, सुकापूरच्या सरपंच योगिता राजेश पाटील, उपसरपंच दिवेश भगत, सदस्य अशोक पाटील, महेश पाटील, पुष्पा म्हस्कर, अनिता पाटील, प्राची जाधव, पं.स.अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सरचिटणीस उदय म्हस्कर, भाजप गाव अध्यक्ष राजेश पाटील, ज्येष्ठ नेते आत्माराम पाटील, हनुमान खुटले, संतोष नाईकडे, माजी उपसरपंच आलुराम केणी, मेनका खुटले, माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील, हिराबाई केणी, युवा नेते प्रमोद भगत, भरत म्हस्कर, प्रमोद पोपेटा, रूपेश पाटील, राहुल पोपेटा, मोहन दळवी, चांगदेव ठाकूर, पंढरीनाथ ठाकूर, विवेक पोपेटा, प्रशांत गांगुर्डे, रूपेश यादव, भरत म्हस्कर, नितेश शर्मा, मंतलाल शर्मा, महिला मोर्चाच्या प्रिया वाघमारे, ममता जैस्वाल, समृद्ध भूमी सोसायटी, साक्षी पार्क सोसायटीचे पदाधिकारी, भाजप नेते एकनाथ देशेकर, माजी सरपंच शांताराम पोपेटा, सरपंच अलका तांडेल, उपसरपंच रोशन पोपेटा, नारायण माळी, नारायण मढवी, नितीन काठावले, प्रितेश डांगरकर, दीपक पाटील, किरण डांगरकर, नितीन पोपेटा, रघुनाथ मोहिते, मदन मढवी, हिरा पोपेटा, अनंता मोहिते, सुनील मढवी, भोकरपाडा येथे वामन फुलोरेे, गोटीराम फुलोरे, अशोक फुलोरे, रमाकांत फुलोरे, योगेश फुलोरे, कुंडलिक फुलोरे, काशिनाथ फुलोरे, भास्कर फुलोरे, गणेश फुलोरे, मनीष फुलोरे, शांताराम म्हात्रे, संतोष भोपी, विष्णू फुलोरे, आदित्य फुलोरे, रूपेश फुलोरे, निकेतन फुलोरे, हर्षल म्हात्रे, अंश गोंधळी, रघुनाथ म्हात्रे, संजय फुलोरे, लहु फुलोरे, नामदेव फुलोरे, हनुमान फुलोरे, संदेश फुलोरे, दत्ता फुलोरे, किशोर फुलोरे, हरिदास फुलोरे, कल्पेश फुलोरे, भगवान फुलोरे, निल फुलोरे, तन्यम पाटील, निशम फुलोरे, ओम फुलोरे, निशा फुलोरे, निर्मल फुलोरे, रत्नमाला फुलोरे, भाविका फुलोरे, अलका फुलोरे, दिया फुलोरे, स्वराज पाटील, विष्णू फुलोरे, गणेश फुलोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
याशिवाय उलवे नोडमध्ये आरोग्य तपासणी शिबिर झाले, तर भानघर येथील करूणेश्वर वृद्धाश्रमात धान्य तसेच फळांचे वाटप करण्यात आले.  या वेळी प्रमुख पदाधिकार्‍यांसह विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, सावळेचे सरपंच सुनील माळी, निलेश भगत, अंकुश पाटील, सुनील पाटील, मयुर कदम, विश्वजीत पाटील, आनंद पाटील, शुभ पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply