Breaking News

चाणजेत शेतकर्‍यांना बांधावर बियाणांचे वाटप

उरण ः प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांना बांधावर बियाणे देण्याच्या पार्श्वभूमीवर उरण कृषी खात्यामार्फतही ही योजना राबविण्यात आली. त्यासाठी सोशल डिस्टन्सचे पालन व खबरदारी घेत खरीप हंगामाची पेरणी करण्याकरिता सहाय्यक कृषी अधिकारी शीतल ढाकणे यांच्या पुढाकाराने चाणजे विभागात बियाणांचे वाटप करण्यात आले.

यामध्ये विशेष जया (महाबीज) रूपाली, जोरदार, वाय येस आर या अधिक उत्पन्न देणार्‍या सहा क्विंटलपेक्षा अधिक बियाणांचे शेतकर्‍यांच्या बांधावर वाटप करण्यात आले. पारंपरिक पद्धतीला बगल देत शंभर टक्के बियाणे बदल हा संकल्प करण्यात आला आहे. उरण तालुक्यासाठी पनवेल येथील भगवान बाबा कृषिसेवा केंद्रातून हे बियाणे उरण कृषी खात्याने शेतकर्‍यांसाठी मागवून थेट शेतकर्‍यांच्या बांधावर देण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी उरण तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी, मंडळ कृषी अधिकारी नागनाथ घरत, कृषी पर्यवेक्षक नवनाथ गरड, शेतकरी चंद्रकांत म्हात्रे, सुमित थळे, कल्पेश घरत, कृषिमित्र रूपेश म्हात्रे आदींनी मेहनत घेतली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply