Breaking News

उसरण धरणातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात; आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

उसरण धरण निर्माणानंतर जवळपास 32 वर्षांनी प्रथमच या धरणाच्या अनुषंगाने नाल्यातून जाणारे गाळ काढण्याचे काम झाले आहे. यासाठी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा कामी आला आहे. देवळोली गावजवळ 1989 साली उसरण या धरणाची निर्मिती झाली. डोंगर कपार्‍यात असलेल्या धरणाचे पाणी धरण क्षेत्र ते सावळे, खत कारखाना या दिशेने पाताळगंगा नदीत समाविष्ट होते. धरण तुडुंब भरल्यानंतर धरणाच्या पाण्याच्या प्रवाहातून मातीचा गाळ जात असतो. गेली 32 वर्षे हा प्रवास सुरू आहे, त्यामुळे प्रवाहात गाळ साचल्याने पुरस्थिती होण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार महेश बालदी यांनी लघु पाटबंधारे विभागाकडे गाळ काढण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून गाळ काढून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत माळी यांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply