उरण ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसह या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत नमाज पठण तसेच एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने उरण शहरासह तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी मशिदीत न जाता आपल्या घरातच सोशल डिस्टन्सिंग तसेच शासकीय व धार्मिक नियमांचे पालन करून सोमवारी (दि. 25 ) सकाळी 7 वाजेनंतर रमजान ईदची नमाज अदा केली. लहान मुलांनी एकमेकांना ग्रीटिंग दाखवून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.