महापालिका क्षेत्रात चौघांचा मृत्यू
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 2) कोरोनाचे 25 नवीन रुग्ण आढळले असून 20 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका क्षेत्रात 23 नवीन रुग्ण आढळले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कामोठेमध्ये 214, खारघरमध्ये 127 रुग्ण, नवीन पनवेल 81, पनवेल 37 आणि कळंबोलीमध्ये 98 रुग्ण झाले आहेत. पनवेल तालुक्यात आजपर्यंत कोरोनाचे 775 रुग्ण झाले असून 481 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर 35 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात मंगळवारी 23 नवीन रुग्ण आढळले आहेत. कामोठे सेक्टर 21 त्रिशूल अपार्टमेंटमधील 65 वर्षीय महिला, खारघर सेक्टर 2 विघ्नहर्ता सोसायटीतीळ 46 वर्षीय व्यक्ती, नवीन पनवेल ए टाइपमधील 67 वर्षीय व्यक्ती आणि कळंबोली रोडपाली येथील आदिवासी चाळीतील 49 वर्षीय महिला यांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यांना अगोदरच्या इतर व्याधीही होत्या. पनवेलमधील साई साफल्य आणि पंचरत्न नाक्यावरील प्रियदर्शनी सोसायटीत प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला.तळोजा येथेही एक रुग्ण आढळला आहे.
खारघरमध्ये 10 नवीन रुग्ण आढळले. यामध्ये सेक्टर 20 श्री सत्यम सोसायटीत आणि सेक्टर 11मधील साई श्रध्दा सोसायटीतील एकाच कुटुंबातील प्रत्येकी चौघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याशिवाय कोपरा गाव आणि ओवेपेठ येथील प्रत्येकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. कळंबोली सेक्टर 3 एलआयजीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. खिडूकपाडा आणि सेक्टर 5 ईमधील प्रत्येकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. कामोठेमध्ये सेक्टर 12 चतुर्थ अपार्टमेंटमधील एकाच कुटुंबातील तिघांना, सेक्टर 34 प्लॅटिनम सोसायटीतील आणि एका हॉस्पिटलमध्ये काम करणार्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आजपर्यंत 2984 टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 565 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 96 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. 338 रुग्ण बरे झाले असून 201 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.82 टक्के आहे. पनवेल ग्रामीणमध्ये मंगळवारी दोन नवीन रुग्ण आढळले असून नऊ जणांनी कोरोनावर मात केली. पाली देवद (सुकापूर) येथील सिध्दी आपर्टमेंटमधील 38 वर्षीय व्यक्ती आणि करंजाडे येथील सेक्टर 1 चामुंडा हिल्समधील चार वर्षीय मुलाला कुटुंबातील व्यक्तींपासून संसर्ग झाला आहे. पनवेल तालुक्यात आजपर्यंत कोरोनाचे 775 रुग्ण झाले असून 481 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 35 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.