
कळंबोली ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बस डेपोच्या बाजूला भाजपचे स्थानिक नेते राजेंद्र बनकर यांनी होमिओपॅथिक औषधे व मास्कचे मोफत वाटप केले. या वेळी भाजप कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, सिद्धेश बनकर, नितीन काळे, ज्येष्ठ कार्यकर्ते शेलार आदी उपस्थित होते.