Breaking News

जेएसडब्ल्यू कंपनी बंद ठेवण्याची मागणी

अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार -आ. रविशेठ पाटील

पेण : प्रतिनिधी – पेण तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये जेएसडब्ल्यु कंपनीतील कामगारांनाही कोरोनाची लागण झालेली असुन कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी जेएसडब्ल्यू कंपनी काही काळ बंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार रविशेठ पाटील यांनी दिला आहे.

अलीकडच्या काळात पेण तालुक्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला असुन आमटेम, गड्ब, झोतिरपाडा तसेच शहरी भागात कोरोना संसर्गित कर्मचार्‍यामुळे अनेक ठिकाणी लागण झालेली असुन आता कंपनी बंद केल्याशिवाय पर्याय नाही याबाबत जिल्हाधिकारी याच्याशी देखील चर्चा करण्यात आली असुन जर लवकरात लवकर कंपनीतील काम बंद झाले नाही तर कोरोना संसर्गाचा धोका वाढणार आहे.

कंपनीसाठी जिल्हा प्रशासन किंवा शासन जर दोन तालुक्यातील जनतेला संकटात टाकू पहात असेल तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे शेवटी आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply