पाली : प्रतिनिधी
अष्टविनायकापैकी एक स्थळ असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश बुधवारी (दि. 20) मंत्रालयात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे देवस्थानचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. तसेच देवस्थानतर्फे सुधागड तहसीलदारांकडे ब्लँकेट देण्यात आले. श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे पूरग्रस्तांना दिलेली ही मदत अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केले. या वेळी भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, देवस्थानचे उपाध्यक्ष जितेंद्र गद्रे, विश्वस्त माधव साने, विनय मराठे, उपेंद्र कानडे, सचिन साठे, राहुल मराठे, व्यवस्थापक चंद्रशेखर सोमण, भाजप सुधागड तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत, सरचिटणीस निखिल शहा आदी उपस्थित होते.